वासिंद । जन्मत: हिमांशू राजू दिवाणे या नवजात बालकाची आधारकार्ड नोंदणीची प्रक्रिया करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एवढ्या कमी वयाची ही पहिलीच नवजात बालकांची आधार नोंदणी असल्याचा दावा तिचे काका अॅड. विजय दिवाणे यांनी केला आहे. नवजात हिमांशूचे वडील राजू दिवाणे व आई सोनाली दिवाणे हे वासिंदजवळच्या गेरसे गावचे रहिवासी असून राजू भारतीय नौदल सेवेत तर सोनाली इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. ठाणे येथील डॉ प्रज्ञा गवळी यांच्या श्री साईश्रध्दा या खाजगी इस्पितळात बाळ जन्मल्यापासून ठाण्यातील आधारकेंद्र संचालिका नंदा महेश कोथले ह्यांनी सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे नवजात बालकाचे सहजरीत्या आधारकार्ड नोंदणी करणे शक्य झाल्याचे दिवाणे दाम्पत्याने यावेळी सांगितले.
हेल्पलाइनवर साधला संवाद
ठाणे येथील डॉ प्रज्ञा गवळी यांच्या श्री साईश्रध्दा या खाजगी इस्पितळात बाळ जन्मल्यापासून ठाण्यातील आधारकेंद्र संचालिका नंदा महेश कोथले ह्यांनी सहकार्य केल्याने 1943 या हेल्पलाईनवरून जन्मल्यापासून एक तासात याबाबतची आधार नोंद झाली. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आधार नोंद मोहिमेचा प्रचार व प्रसार व्हावा व या योजनेचे महत्त्व जाणून प्रत्येकानेच आधार नोंदणी करावी म्हणूनच आम्ही आमच्या एक तासाच्या नवजात हिमांशूची आधार नोंदणी केल्याचे दिवाणे दाम्पत्याने सांगितले.