जन्मदात्यांची सेवाच ईश्‍वरप्राप्तीचे साधन

0

वरणगाव। सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस खुपच व्यस्त झाला आहे. मात्र, उच्चशिक्षित झालो म्हणून मरणोत्तर विधी-क्रियांना आडफाटा देवू नका. धर्मशास्त्रानुसार विधीवत श्राद्ध पूजन केले पाहिजे. तत्पूर्वी, जीवंतपणीच आई-वडिलांच्या सेवेते कसूर करु नका, जन्मदात्यांची सेवाच ईश्‍वरप्राप्तीचे साधन आहे, असे दुर्गादास महाराज नेहेते खिर्डीकर यांनी सांगितले. वरणगावमध्ये झालेल्या कीर्तनात ते बोलत होते.

परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता
शहरातील विल्हाळे रोडवरील रहिवासी भानुदास जोगी यांच्यामार्फत दुर्गादास महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पूर्वजांनी अनेक चांगल्या गोष्टींची परंपरा लावून दिली आहे. मात्र, आताच्या धावत्या युगात कोणालाही वेळ नाही. यामुळे मरणोत्तर विधी-परंपरा कमी वेळेत पार पाडण्यावर भर असतो. याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. पंचत्वात विलीन झालेल्या आत्म्याला मुक्तीचे विविध मार्ग आहेत. त्यात पिंडदान, घास टाकणे, दहावे, अकरावे, तेरावे, चौदावे, पंधरावे असे विविध प्रकार आहेत. असे असले तरी प्रत्येकाने जीवंतपणीच आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यावी. उतारवयात त्यांन जपावे. यातून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल, असे भानुदास महाराज म्हणाले. गोडेगाव येथील भजनी मंडळीने साथ दिली. शांतारामा जोगी, भरतकुमार जोगी, चंद्रकुमार जोगी, भानुदास जोगी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पंचक्रोशितील भाविकांची गर्दी झाली होती. विशेषत: महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.