जन्म- मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती मिळविण्यासाठी ईश्‍वरभक्ती करा

0

हंबर्डी । कीर्तन हे जिवाला तारुन नेणारे माध्यम आहे. लक्ष योनींच्या फेर्‍यातून मुक्ती मिळविण्यासाठी कीर्तन नामस्मरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालकीर्तनकार हेमांगी मराठे यांनी केले. हंबर्डी येथे नुकताच कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी बालकीर्तनकार हेमांगी मराठे यांनी संत गोरोबा कुंभार यांच्या ओव्यांच्या माध्यामातून भक्तिचा महिमा वर्णन केला.

यावेळी त्या म्हणाल्या की, उत्तरकार्य म्हणजे काय तर जीवनाचे उत्तर मिळाले तर कार्य होते ते उत्तरकार्य. अशाप्रकारे अवधूत संप्रदायाचे बालकीर्तनकार हेमांगी मराठे यांनी वर्णन केले. या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी जळगाव येथील अवधूत भजनी मंडळाच्या सेवेकर्‍यांनी
सहकार्य केले.