पुणे : जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील गलथानपणाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी मुख्यसभेत दिले. काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी एकाच व्यक्तीचा एकाच दिवशी काढलेला जन्म आणि मृत्यू दाखला सभागृहात दाखवला. हे प्रकरण गंभीर असल्याने याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात चाललेल्या प्रकाराबाबत शिंदे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. एवढेच नव्हे तर त्यांनी एका व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू दाखला दाखवला. यावरून डुप्लिकेट दाखले दिले जातात का, गैरप्रकार होतो का याबाबत चौकशी करणार आहात का, असे दाखले दिले गेले आहेत का यासाठी यंत्रणा महापालिकेत आहे का, याविषयी प्रश्न उपस्थित केला. यावर गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी मुख्यसभेत दिले. तर वॉटर मार्क याबाबत सतर्कता बाळगण्याविषयीच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या.