जन्म-मृत्यू डेटा एंट्री संस्थेस तीन महिन्याची मुदतवाढ

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंदीचा डेटा एंट्री करणे आणि दाखले वितरित करणा-या काळेवाडी येथील साई एंटरप्रायजेस या संस्थेच्या कामकाजाला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. जन्म -मृत्यू नोंद घेणे व त्याचे दाखले वितरित करण्याचे काम दहा उपनिबंधकांमार्फत आणि वायसीएम, भोसरी रुग्णालय, जिजामाता, सांगवी, आकुर्डी, तालेरा रुग्णालय, फु गेवाडी दवाखाना, प्राधिकरण दवाखाना आणि पिंपरी वाघेरे दवाखाना येथे सुरु आहे. या कामासाठी निविदा मागवून सर्वांत क मी दराची निविदा सादर करणा-या साई एंटरप्राईजेसला हे काम दिले होते. या कामासाठी महापालिकेतर्फे संगणक, प्रिंटरची व्यवस्था करण्यात येते. तर लागणारी स्टेशनरी, कार्टेज, कामगार आणि अन्य आवश्यक साहित्य हे ठेकेदारांतर्फे पुरविण्यात येते.

31 डिसेंबरला संपणार होती मुदत
मराठी डेटा एंट्री तीन रुपये 10 पैसे तर इंग्रजी डेटा एंट्री दोन रुपये 90 पैसे आणि बारा रुपये प्रति संगणक दाखला या दराने संबंधित संस्थेला पाच वर्षाच्या कालावधीसाठी हे काम देण्यास पालिकतर्फे मंजुरी दिली होती. त्याची मुदत 31 डिसेंबर 2017 ला संपणार आहे. नवीन संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे साई एंटरप्राईजेस या संस्थेला तीन महिन्याची मुतदवाढ देण्यात आली आहे.