जन-धन, वन-धन आणि गोबर-धन हेच सरकारचे लक्ष- मोदी

0

अहमदाबाद –तंत्रज्ञानाचा उपयोग करत या संसाधनाचा वापर करणे गरजेचे असून पुढील काळात त्यावर भर देण्यात येईल. जन-धन, वन-धन आणि गोबर-धन हेच आमचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गुजरातमधील आंनद डेअरीच्या अत्याधुनिक प्लांटच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. अमुल डेअरीच्या उद्धघाटनाबरोबरच ते मुझकुवा गावातील आनंद एग्रीकल्चर युनिवर्सिटीतील अन्न प्रक्रिया केंद्र आणि सोलार को-ऑपरेटीव्ह सोसाटीयचे उद्घाटन करतील. या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी एका सभेला उद्देशून भाषण केले.

यावेळी ते म्हणाले जगातील अनेक देशांत साम्राज्यवाद आणि भांडवलशाही पाहायला मिळते. मात्र महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी आम्हाला मध्यममार्ग दाखवला. ग्रामिणांच्या उध्दाराचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचेही ते म्हणाले. तसेच जन-धन, वन-धन आणि गोबर-धन हेच आमचे लक्ष्य असून पुढील काळात उर्जा निर्मितीचे आणि संपत्ती निर्मितीचे अधिक अधिक साध्य असेल. ही बाब शेतकरी वर्गाला साह्यभूत ठरेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.