जपानची बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा त्यांची शिक्षणव्यवस्था आणा

0

अमळनेर । जापानची बुलेट ट्रेन भारतात आणण्यापेक्षा जापानची शिक्षण व्यवस्था ही भारतात आणावी म्हणजे भारतीय तरुण स्वतः बुलेट ट्रेन तयार करतील, असे मत पत्रकार परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तसेच दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. त्यांच्या सोबत विश्वस्त अशोक आंबेडकर हे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब यांच्या विविध सुत्रांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अरुण नेतकर, जिल्हाकार्याध्यक्ष श्रीकांत खैरनार, जिल्हाउपाध्यक्ष भीमराव मगरे, महारष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनेश हनमंते, जनसंपर्क अधिकारी वैभव दभडगे, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा सुमन जोंधले, दिनेश खाडे, श्याम संदानशिव, साहेबराव शेजवळ आदि उपस्तित होते.

पत्रपरीषदेत विविध विषयांवर चर्चा
दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 साली केली. यावेळी या संस्थेचे सभासद होण्यासाठी दोन अटी ठेवण्यात आल्या एक म्हणजे बौद्ध दीक्षा घेणे आणि दुसरी म्हणजे वार्षिक सभासद फी एक रूपये भरणे. भारतात बौद्ध धर्माची जनगणनेनुसार जी आकडेवारी आहे. ती खोटी तसेच दिशाभूल करणारी आहे. कारण भारत सरकारने 2011 ची भारतातल्या बौद्धाची जी लोकसंख्या सांगितली आहे ती 0.6 टक्के आहे. पण वास्तवात ती जास्तीची संख्या आहे. जागतिक पातळीवर बौद्धीष्ट राष्ट्राबरोबर भारतातल्या बौद्ध धर्माच्या लोकांचे सुत जुळवून येवु नये म्हणून शासन त्यांना नवबौद्ध म्हणून दाखले देते. परंतु ते आम्हाला मान्य नाही. तसेच भारतातील काही राज्यात दुर्गम भागात आर्धिक दृष्टया मागासलेला समाज धर्मांतर करतो ते चुकीचे असून धर्मांतर हे वैचारिकतेवर अवलंबून असले पाहिजे आणि यासाठी आम्ही संपूर्ण देशभरात बुद्धमय भारत जागृती अभियान राबवित आहोत.