जपानच्या ओकुहारवर मात करत सायना नेहवाल उपांत्य फेरीत

0

नवी दिल्ली : मलेशिया मास्टर्स चषकात भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने महिला एकेरीत जपानच्या नोझुमी ओकुहारवर मात करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सायनाचा सामना कॅरोलिना मरीनशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने नोझुमी ओकुहारचा 21-18, 23-21 असा पराभव केला आहे.

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटनमध्ये सायनाला सातवे मानांकन देण्यात आले आहे. सायनाला हा सामना जिंकण्यास ४८ मिनिटांचा अवधी लागला. जगात नवव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने ओकुहाराविरोधात खेळलेल्या १३ सामन्यातला हा नववा विजय आहे. गतवर्षी डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनमध्येही ओकुहाराला पराभूत केले होते. उपांत्या फेरीत सायनाचा सामना चौथ्या मानांकन प्राप्त स्पेनच्या कॅरोलिना मारिनशी होणार आहे.