जप्त अवैध वाळू साठ्याचा तावखेडा येथे पंचनामा

0

शिंदखेडा । तालूक्यातील तावखेडा प्र.सोनगीर येथे बाभळाच्या झाडीत रविवारी दि.19जून रोजी अवैध वाळूसाठा आढळून आला होता. या संर्दभात बळवंत मूरलीधर बडगूजर यांचे विरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला आहे. 9 लाख रूपये किंमतीचा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. तालूक्यातील तावखेडा प्र.सोनगीर येथे बाभळाच्या झाडीत अवैध वाळूसाठा असल्याची माहिती मिळाल्यावर रविवार 19जून रोजी रात्रीच तहसिलदार रोहिदास वारूडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी वाळू साठा असल्याचे आढळून आले. रात्र झाल्याने वाळू साठ्याचा पंचनामा करता आला नाही.रात्रीतून वाळूसाठा उचलून नेऊ नये म्हणून तहसिलदार वारूडे यांच्या सूचनेनूसार पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज 20जून रोजी या साठ्याचा पंचनामा करण्यात आला.वर्षी मंडल अधिकारी आढावे व तलाठी पवार,शिंदखेडा मंडळ अधिकारी पंडीत दाळवे उपस्थित होते. या संर्दभात वर्षी येथील बळवंत मूरलीधर बडगुजर यांचे विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.