जळगाव । दाणाबाजार येथील शिव प्लॅस्टिक पिशव्या व साहित्य विक्रीच्या होलसेल दुकानावर बुधवार 13 सप्टेंबर रोजी आरोग्य तसेच अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई ली होती. यात कारवाईत दुकानाच्या चौथ्या मजल्यावरील गोडावूनमधून 10 टन प्लॅस्टिकच्या 20 मॅक्रोमच्या पिशव्यांच्या 370 बॅग्ज्स जप्त केल्या होत्या. काल चार ट्रॅक्टरमधून 258 पोते हे महापालिकेच्या गोडावूनमध्ये जमा करण्यात आले होते. तर उर्वरीत 112 पोते आज जमा करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी उदय पाटील यांनी दिली आहे.
दाणाबाजारात केली कारवाई
महापालिकेतर्फे शहरात सोमवारपासून अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे अतिक्रमण कारवाई त्याचसोबत आरोग्य विभागातर्फे प्लॅस्टिक पिशव्या विक्री करणार्या दुकानदारांविरुद्ध तीव्र मोहीम उघडण्यात आली आहे. यात बुधवारी दाणाबाजारातील एका होलसेल दुकानातून तब्बल 10 टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी आज या दुकानातून उर्वरीत 112 पोते आज जप्त करून ते महापालिकेच्या बालंगर्धव नाट्यगृहाजवळील महापालिकेच्या गोडावूनमध्ये जमा करण्यात आले.
महापालिका पथक सज्ज
तसेच याच बाजार पेठेतील काही प्लपस्टिक विक्रेते पथकाच्या रडारवर असून त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई केली जाणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनी 50 मॅक्रोमच्या खालील प्लॅस्टिक पिशव्या घेवू नये, अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बळिरामपेठ, सुभाष चौक आदी ठिकाणी सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेअंतर्गत आज सर्व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण निमुर्लन पथक हे दिवसभर ठाण मांडून होते. तसेच यापथकाकडून विक्रेत्यांना ख्वॉजामिया येथे दिलेल्या जागेवर व्यवसाय करण्याचा सल्ला महापालिका कर्मचार्यांकडून दिला जात होता.