नवी मुंबई । घणसोली विभाग कार्यालयाच्या वतीने स्वच्छतेस अडचणीच्या ठरणारी रस्त्यावरील वाहने जप्त केली खरी. परंतु, त्या वाहनांच्या आतील साहित्य चोरने व काचा फोडण्याचे प्रकार अज्ञाता कडून होत असल्याने संबंधित मालकांना कसे सांभाळायचे असा प्रश्न पडला आहे. साहित्य चोरी व काचा ज्या वाहनांच्या फोडल्या आहेत त्यांनी मनपाकडे भरपाईची मागणी केली आहे. सध्या मनपा परिसरात स्वच्छता मोहीम 2018 जोरात चालू आहे. परंतु, अनेक दिवसा पासून रस्त्याच्या कडेला धूळ खात उभ्या असलेल्या वाहनामुळे स्वच्छता करण्यास प्रतिबंध येत होता.म्हणूम मनपा आयुक्त एन. रामास्वामी यांच्या आदेशा नुसार ही वाहने जप्त करण्याचा आदेश दिला.तसेच परिमंडळ 2 या विभागा साठी ऐरोली सेक्टर 6 येथील एनएमएमटी च्या मोकळ्या भूखंडावर जप्त केलेली वाहने ठेवण्याचे आदेश देण्यात आले तसेच वाहनावर देखरेख करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्तीही करण्यात आली.
चोरांकडून अंधाराचा गैरफायदा
गेल्या सात दिवसांपासून 50 ते 60 वाहने जप्त केली. परंतु, जप्त केलेल्या वाहनांच्या काचा फोडून आता टेप व इतरही साहित्याची चोरी अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरटे मोठ्या प्रमाणात करत आहेत. तसेच काही वाहनांच्या टायरचीही चोरी झाली आहे. वाहनातील साहित्याची चोरी करताना मोठ्या प्रमाणात काचाही फोडण्यात आल्याने वाहन मालकांच्या मनात उग्र नाराजी व्यक्त होत आहे. या वाहनावर देखरेख करण्यासाठी जरी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असली तरी तुलनेने हा भूखंड मोठा असल्याने लक्ष ठेवण्यास सुरक्षा रक्षक असमर्थ ठरत आहेत तसेच येथे अंधाराचा फायदा घेऊन चोरटे फायदा घेत असल्याचे सुरक्षा राक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे ते वाहन मालक पुढे काय कृती करतात हे औत्सुक्याचे ठरेल. याबाबत सहाय्यक आयुक्त राजेश ठाकूर यांना विचारले असता, हा विषय परिमंडळ दोन कार्यालयाच्या हातात आसल्याचे त्यांनी सांगितले.