जबरदस्ती करणाऱ्यांना शिक्षा मिळायला हवी – लता मंगेशकर

0

मुंबई : #MeToo मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. लैंगिक शोषणाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेने सगळ्यांची झोप उडवली आहे. अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल उघड बोलताना दिसून येत आहे. याच बद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपले मत व्यक्त केले.

मीना मंगेशकर यांनी लिहिलेल्या ‘मोठी तिची सावली’ या चरित्राच्या प्रकाशनाच्यावेळी, #MeToo अभियानाबद्दल प्रश्न विचारला असता लताजी म्हणाल्या, ”काम करणाऱ्या महिलांबद्दल आदर आणि सन्मान दिला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे मला वाटते. जर कोणी त्यांच्यावर जबरदस्तीने हस्तक्षेप करीत असेल तर त्यांना जरुर धडा मिळाला पाहिजे.”