भुसावळ प्रतिनिधी दि 28
शहरातील खडका रोडवरील जाम मोहल्ला भागातील शेख शाकिब शेख दाऊद याचे विरुद्ध चाळीसगांव पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून संशयित फरार होता. वरिष्ठांच्या आदेशावरून संशयित आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले होते.त्यानुसार पथक तयार करून गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी शेख शाकिब शेख दाऊद राहणार जाम मोहल्ला भुसावळ यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. सविस्तर वृत्त असे की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किसन नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना व नमुद पथकास सदर आरोपीता बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची खात्री करून पुढील कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने नमुद पथक हे भुसावळ येथे जावून मिळालेल्या माहितीची खात्री करून संशयित आरोपी शेख शाकिब शेख दाऊद (वय.२१) राहणार जाम मोहल्ला भुसावळ यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास विचारपुस करून त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिल्याने यास चाळीसगाव शहर पो.स्टे. दाखल गुन्ह्याचे पुढील तपासकामी चाळीसगाव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार जळगाव, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक,चाळीसगाव व मा. अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगांव, किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी सर्व नेम स्थागुशा जळगाव अशांनी मिळून केली