जबरी चोरी प्रकरणी कुविख्यात ‘भैस की मुंडी’ पोलिसांच्या जाळ्यात

0
भुसावळ- ‘भैस की मुंडी’ चक्रावलात ना ! हे कुठल्या पदार्थ वा डीशचे नाव नाही तर पोलीस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जबरी चोरी प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात  दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी अक्षय उर्फ भैस की मुंडी कैलास बडगुजर (19, भुसावळ) हा पोलिसांना चकमा देत असल्याने त्याचा कसून शोध सुरू होता.
रविवारी आरोपी वाल्मीक नगरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  यास रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, एएसआय आनंदसिंग पाटील, रवी तायडे यांनी त्यास अटक करीत सावदा पोलिसांच्या ताब्यात दिले.