जबरी लूट : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी भागातून मुसक्या आवळल्या आहेत. अशोक उर्फ अशक्या सदाशीव कोळी (26, रा.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा
आरोपी अशोक कोळी विरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून आरोपी पसार असल्याने त्याचा कसून शोध सुरू असतानाच लोहमार्गचे हवालदार दिवाणसिंग राजपूत यांनी आरोपीबाबत अहवाल दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी आरोपी जळगावच्या सुप्रीम कॉलनीतून ताब्यात घेत भुसावळ लोहमार्गच्या ताब्यात दिले

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग धर्मा पाटील, विकास सातदिवे, किशोर पाटील, गणेश शिरसाळे व मुकेश पाटील तसेच भुसावळ लोहमार्गचे हवालदार अजीतत तडवी तसेच दिवाणसिंग राजपूत आदींनी ही कारवाई केली.