जबर मारहाणीतील एकाचा जामीन अर्ज फेटाळला

0

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव येथे 18 जून 2016 रोजी किरकोळ कारणावरून आठ जणांनी दोघांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयिताला 28 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याने अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज बुधवारी फेटाळला आहे.

दसेगाव येथील इम्रान शेख शब्बीर शेख, शेख निसार शेख गनी यांना आठ जणांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चाळीसगाव पोलिसांनी दीपक अशोक वाघ याला 28 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी केलेला अर्ज न्यायाधीश कटारीया यांनी फेटाळला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.