जबर मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू

0

माथेरान । माथेरानचा तरुण योगेश गोरे आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरुन बहीणीच्या घरी महाबळेश्‍वर येथे जात असताना त्याचे अपहरण केले. तसेच त्याला जबर मारहाण करत सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेत योगेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. योगेश हा आपला मित्र अक्षय परब याच्या सोबत मोटरसायकल वरून महाबळेश्‍वरच्या दिशेने जात असताना याचदरम्यान दि. 14 रोजी भोर जवळ त्याची बाईक एका गाडीला किरकोळ घासली आणि त्या गाडीतील लोकांबरोबर त्यांचा वाद झाला.

नुकसानभरपाई म्हणून 10 हजार रुपये देण्याची त्याच्याकडे मागणी करण्यात अली. या दरम्यान त्याने त्याचे मेव्हणे सखाराम ढेबे यांना फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली त्यावेळी त्यांनी देखील नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली आणि त्या गाडीतील लोकांना सातारा येथील गॅरेजमध्ये येण्याचे सांगितले. दरम्यान योगेशला गाडीत बसवण्यात आले आणि काही अंतर पुढे गेल्यावर योगेश त्याच्या मित्राला रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.