जळगाव । शेतकर्यांना पिकांचे उत्पादन घेतांना त्याची सांगड ही जमिनीच्या उत्पादकतेशी घालावी. जेणेकरुन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत होईल. तसेच पिक कर्ज दर, पिकांची उच्चतम उत्पादकता यांचाही अवश्य विचार करुन पिकांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे दिले.
या कार्यशाळेत कृषि विभागाचे ग्रामपातळीवर काम करणारे क्षेत्रिय कर्मचारी कृषि सहाय्यक, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आदींना जमिन उत्पादकता वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जिल्ह्यातील पिकपद्धतीनिहाय प्रत्येक पिकांच्या उत्पादकता वाढी बाबत शेतकर्यांना द्यावयाच्या तांत्रिक सल्ल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी निंबाळकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, डॉ. एम.आर. बेडीस, ‘आत्मा’ प्रकल्प उपसंचालक सुदाम पाटील, कृषि शास्त्रज्ञ बी.डी. जडे, उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ चा आढावा घेतला.