जमीन व्यवहारांत हस्तक्षेप भोवला; एपीआय दळवी सस्पेंड

0

देहूरोड : देहूरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित दळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ही कारवाई केली.

देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमीन व्यवहारांच्या प्रकरणात दळवी यांनी मध्यस्ती केल्याने कारवाई केल्याचे चर्चिले जात आहे. त्यांच्याविरोधात नागरिकंनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सुवेझ हक यांनी दळवी यांच्या निलंबनची ऑर्डर काढली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. आकाश शिंदे यांनी दळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.