मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी या खेळाचा विषय आला की, काहीही पाहत नाही विरोेध संघ आहे की नाही त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाही. असा काहीचा प्रकार विजय हजारे ट्रॉफी सामन्यात झारखंडने जम्मू काश्मीर क्रिकेट टीमचा पराभव केला असला तरी या पराभवाचा विसर पडावा अशी भेट या खेळाडूंना मिळाली आहे. टीमचा कप्तान परवेझ रसूल याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या टीममधील खेळाडूंना झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर बोलण्याची चर्चा करण्याची प्रचंड इच्छा होती व त्यानुसार रसुलने विनंती करताच माहीने कोणतेही आढेवेढे न घेता जम्मूकाश्मीर टीममधील खेळाडूंशी ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली.
फलंदाजांनांही सांगितल्या काही युक्तीच्या गोष्टी
यावेळी धोनीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व कांही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. धोनीने या खेळाडूंचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. टीममधील विकेट किपरला काही महत्त्वाच्या टिप्स देताना धोनीने फलंदाजांनांही कांही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. धोनीशी संवाद साधल्याने या खेळाडूंना खूप कांही शिकायला मिळाले असे रसूल म्हणाला. रसूल धोनी बरोबर या पूर्वी खेळलेला आहे मात्र त्याच्या टीममधील तरूण खेळाडूंना धोनीला भेटायचे होते, ज्याच्याशी आमनेसामने चर्चा करायची होती. त्यांची ही इच्छा धोनीने पूर्ण केल्याने टीमखेळाडू खूपच आनंदले.