जम्मू कश्मीरचे राज्यपाल हे सरकारी चमचे: संजय निरुपम

0

श्रीनगर: जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे भाजपचे चमचे आहेत अशी टीका कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे. देशातले सगळे राज्यपाल हे सरकारचे चमचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा जो आरोप लावण्यात आला होता त्या आरोपातून राजीव गांधी यांची निर्दोष सुटका झाली होती, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी राजीव गांधींविषयी वक्तव्य करताना असे म्हटले होते की, राजीव गांधी हे सुरुवातीच्या काळात भ्रष्टाचारी नव्हते पण त्यांचा काही लोकांशी संपर्क आल्याने ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफोर्स घोटाळा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आयएनएस विराटचा खाजगी वापर केल्याचा आरोप केला होता, या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राजीव गांधींचे जवळचे असणारे मित्र अमिताभ बच्चन यांनी सत्य काय होते ते जनतेसमोर आणावे असे आवाहन कॉंग्रेसचे नेते यांनी केले आहे.