अखनूर: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. येथील अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना हा संशयास्पद स्फोट झाला असे वृत्त सांगण्यात येत आहे. या भीषण स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारांदरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला.