जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदी मनोज सिन्हा

0

श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. गिरीष चंद्र मूर्मू यांनी काल बुधवारी राजीनामा दिला, तो राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. मनोज सिन्हा यांना भाजपमध्ये मोठे स्थान आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या मोदी सरकारमध्ये त्यांना रेल्वे राज्यमंत्री पद देण्यात आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.