मुंबई । जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे, ही युती देशद्रोही होती. अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपने मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या प्रर्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते आणि अशात सरकारने शस्त्रसंधी उठवल्यानंतर भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता भाजपने मुफ्तींच्या सरकारचा पाठींबा काढून घेत युतीतून काडिमोड घेतला आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणीही यावळी भाजपकडून करण्यात आली आहे.