जम्मू-काश्मीरमध्ये चकमक : ४ पोलीस शहीद

0

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील अरहामा गावात आज पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ४ पोलीस शहीद  झाले आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांकडील शस्त्र हिसकावून दहशतवादी फरार झाले. भारतीय लष्कराने परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.