1 जवान शहीद, 2 जखमी
श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला असून, दोनजण जखमी झाले. रविवारी होणार्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरील बसस्थानकात हा हल्ला घडवून आणण्यात आला. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा दल आणि दहशहतवाद्यांवमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरच्या दौर्यावर असून, या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांनी या कारवाया घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
शांततेसाठी कुणाशीही चर्चा : राजनाथ सिंह
अनंतनाग येथे शनिवारी पोलिस पथकावर दहशवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 1 जवान शहीद तर 2 गंभीर जखमी झाले. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्येच बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे भागात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी सोपोरे शहराजवळील रेबन गावाला वेढा दिल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला. या चकमकीमुळे शहरातील नागिरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित यंत्रणांकडून उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर चुकीची माहिती पसरवली जाऊ नये यासाठी इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. राजनाथ हे चार दिवसांसाठी जम्मू्-काश्मीरच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील शांततेसाठी कुणाशीही चर्चा करण्यासाठी मी तयार असल्याचे म्हटले आहे.