बांदिपोरा : जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे शनिवारी सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले.
बांदिपोरा येथील हाजिन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, केंद्रीय राखीव पोलीस दल, हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरु केली. सुरक्षा दलांनी चारही बाजूंनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.