नवी दिल्ली: आज केंद्रातील मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ३७० कलम रद्द करण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहा यांनी केली, तसे विधेयक त्यांनी मांडले. राज्यसभेत सरकारचे बहुमत नसल्याने जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयकावर राज्यसभेत दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात येत आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात ६१ मत पडली. विधेयक संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळ येत पाठ थोपटून शाबासकी दिली.
६.४२ मिनिटाला जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयकावर मतदान सुरु झाले. मशीनद्वारे मतदान घेण्यात येत होते, मात्र मशीनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेवटी चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले.