जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त; भाजपने बोलविली तातडीची बैठक

0

श्रीनगर-काल राज्यपाल सत्यपास मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांचा हा निर्णय पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. दरम्यान आज भाजपने आमदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पुढील वाटचालीबाबत विचार विनिमय होणार आहे.

भाजपकडून सत्ता मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहे. मात्र पीडीपी आणि कॉंग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकते असा दावाही केला जात आहे. पीडीपी कॉंग्रेसला उमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फ्रेंस बाहेरून पाठिंबा देऊ शकते.

पीडीपीजवळ 28, नॅशनल कांफ्रेंसजवळ 15 आणि कॉंग्रेसजवळ १२ आमदार आहे. त्यामुळे तिघांनी मिळून सरकार स्थापन करणे अवघड नाही.