भुसावळ। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नगरपालिका उर्दू शाळा
भुसावळ येथील पालिका उर्दू शाळा क्रमांक 3 येथेे माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख शफी शेख अजिज, मुख्याध्यापक हमिद शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी शेख अख्तर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जहिरुद्दीन शेख, सत्तार मुतवल्ली, रशिदमुल्ला, हाजी तौसिफ खान, शेख रऊफ उपस्थित होते.
रेल्वे स्काऊट-गाईड
मध्य रेल्वेच्या स्काऊट-गाईड विभागातर्फे जिल्हा शिबीर मैदान येथे कार्यक्रम घेण्यात आला. स्काऊटर सुशिल पगारे, अनिल तिवारी, लक्ष्मण बैरागी, धम्मपाल साळुंके, इम्तियाज अली, अर्शद खान, रितेश शिंदे, विरेंद्र चावरिया, शेख सलिम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्रिशरणचे वाचन करुन सामुहिक मानवंदना देण्यात आली. यशस्वीतेसाठी जिल्हा आयुक्त डॉ. तुशाबा शिंदे, आर.एम. गेडाम यांचे सहकार्य लाभले.
अहिल्यादेवी कन्या विद्यालय
येथे मुख्याध्यापिका प्राची देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. गौरी बारेला, भैरवी गोसावी, धनश्री चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मधुकर वाणी, सोनाली वासकर यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन अर्चना पाटील यांनी तर आभार सुधाकर सपकाळे यांनी मानले.
वरणगाव आयुध निर्माणी
वरणगाव आयुध निर्माणी व दर्यापुर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न झाली. महाप्रबंधक शिवदत बाजपेयी, अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता, समिती चेअरमन प्रणिल भगत, एम.झेड. पडवेकर, युनियनचे पदाधिकारी यांच्या ह्स्ते बाबासाहेबांच्या पूतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
वरणगाव नगरपालिका
येथील नगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे, सुनील काळे, राजेंद्र चौधरी, रवि सोनवणे, गणेश धनगर, विष्णू खोले, विकीन भंगाळे, नगरसेविका रोहिणी जावळे, शशि कोलते, वैशाली देशमुख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गंभीर कोळी, संजय माळी, सुधाकर मराठे, गणेश कोळी, राजू सोनार, रवि नारखेडे, अनिल तायडे आदी उपस्थित होते.
वरणगाव शहरात काढण्यात आली मिरवणूकफ
वरणगाव शहरातील सिध्देश्वरनगर, सम्राटनगर, रेल्वे स्टेशन, वामन नगर, आंबेडकर नगरात ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. सिध्देश्वर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे रथ पूजन नगराध्यक्षा अरूणा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती माला मेढे, सामाजिक कार्यकर्ते मिलींद मेढे, शामराव इंगळे आदी समाजबांधव उपस्थित होते.
जयंती उत्सवासाठी समिती अध्यक्ष मयूर सुरवाडे, विशाल तायडे, विशाल बोदडे, दिपक भैसे, आकाश इंगळे, अरविंद सुरवाडे, नरेंद्र भैसे, विलास इंगळे, विक्की भैसे, रितेश सुरवाडे, छोटू मोरे, पप्पू सुरवाडे, पप्पू सोनवणे, बंटी मोरे, अक्षय भैसे, अजय तायडे, रिंकू इंगळे, सिध्देश्वरनगर जयंती समिती अध्यक्ष सुशांत सुरवाडे तर उपध्यक्ष दिपक पवार, पवन वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, मेहराज वानखेडे, प्रशांत वाघ, ज्ञानेश्वर जोहरे, अजय सुरवाडे, विक्की मोरे, महेन्द्र बोदडे, राजेश थोरात, स्वप्निल सुरवाडे, गोलू इंगळे, उमेश सुरवाडे, बंटी सुरवाडे, भोला इंगळे, माजी सैनिक सुधीर वाघोदे, दिपक कोचरे, किरण सुरवाडे, सुभाष वाघ, संतोष प्रधान, सुनिल महाले, सुजय तायडे, मेघराज वानखेडे, राहुल इंगळे, राजेश इंगळे, अशोक इंगळे, अशोक मेढे, भागवत इंगळे, डिंगबर सुरवाडे, किशोर तायडे, रुपेश मेढे, मुकेश मेढे, किरण तायडे, नरेंद्र इंगळे आदी समाजबांधव उपस्थित होते.
वरणगाव महाविद्यालय
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन प्राचार्य अनंतराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्रचार्य के.बी. पाटील, प्रा. डी.एल. पाटील, प्रा. पी.बी. देशमुख, प्रा. बी.बी. पाटील, प्रा. एस.एम. वानखेडे, प्रा. डॉ. बच्छाव, प्रा.डॉ. अशोक चित्ते, प्रा. ए.एम. कलबले, प्रा. व्ही.ई. पाटील, प्रा. वृषाली जोषी, प्रा.डॉ. पवार, संध्या निकम, राहुल ठाकूर, एस.डी. पाटील, सु.रा. देशमुख, नितीन चव्हाण, सुनिल गुरचळ, दिव्यानी वाघ आदी उपस्थित होते.
बुध्द धम्म प्रतिष्ठान, रावेर
येथील जय भीम बुध्द धम्म प्रतिष्ठानतर्फे जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक संजीव तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अभ्यासिका केंद्रात 18 तास अभ्यासिका वर्गाचे आयोजन करण्यात आले. पी.एस. तायडे, राजेंद्र तायडे, डी.टी. मोरे, पी.आर. तायडे, जे.आर. घेटे, एम.एफ. तडवी, के.के. महाजन उपस्थित होते.
जिल्हा परिषद उर्दू शाळा, खिर्डी
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ज्ञानदिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख अलताफ शेख बशीर, उपाध्यक्ष शेख कय्युम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक अहेमद खान समद खान, उपशिक्षक आदिल खान यांनी व्याख्यान दिले. यावेळी उपशिक्षक अनीस खान, जावेद खान आदी उपस्थित होते.