जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भिकन पाटील

0

नवापूर। नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप यांची जयंतीनिमित कार्यकारणी गठीत करण्यात आली. सालाबादप्रमाणे वीर महाराणा प्रताप यांची जयंती 28 मे रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून भिकन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी- नाना गिरासे, संदिप दर्जी, सचिव- दुर्गेश पाटील, कोषाध्यक्ष -भटेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तर सल्लागर म्हणून राजपूत समाजाचे अध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक अजय पाटील ,दर्शन पाटील, प्रा.नवल पाटील, समाजाचे सचिव रामकृष्ण पाटील, हसमुख पाटील,शरद पाटील, डॉ जयंवत गिरासे, अजय भरत पाटील, डॉ.कमलेश पाटील, गुलाबसिंग जमादार, रणजितसिंह पाटील, धमेश पाटील, अनंत पाटील, हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जयंती निमित राजपूत समाजातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.