जयंती उत्सव समिती निवडीवरून वादानंतर गोळीबार : भुसावळातील पसार संशयीत शहर पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : शहरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादानंतर दोन गटात हाणामारी झाली होती तर दगडफेकीत कार, मोटर सायकलीचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना 25 फेब्रुवारी 2019 रोजी शहरातील समता नगरात घडली होती. या घटनेतील पसार आरोपी योगेश हिरालाल मोघे (27, रा.भुसावळ) यास शुक्रवार, 5 रोजी भुसावळ परीसरातून अटक करण्यात आली. संशयीतास भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सन 2019 मध्ये भुसावळातील समता नगरात झालेल्या वादानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल होता व त्यात संशयीत योगेश हिरालाल मोघे हा वॉण्टेड असल्याने त्याचा शोध सुरू असतानाच त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, बाजारपेठ प्रशांत सोनार, जाकीर मन्सुरी, इकबाल सैय्यद यांनी ही कारवाई केली.