जयंत गुरुजींनी घेतली शाळा….

0

नंदुरबार : आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मरगळ आलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला या मेळाव्याने ऊर्जा मिळाली खरी पण राष्ट्रवादी चे दुसरे रूप देखील पाहायला मिळाले. या मेळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाळा घेतल्याने जिल्ह्यातील नेत्यांची चांगलीच पंचायत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या कमेट्या फक्त कागदावरच असल्याचे गुरुजींना पाहायला मिळाले.दोन,तीन वगळता कमिटी प्रमुख हे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित नव्हते. दरम्यान  जयंत पाटील हजेरी मस्टरच घेऊन बसलेले पाहायला मिळाले.जो कार्यकर्ता व समिती प्रमुख अनुपस्थित होते त्यांच्या नावांवर टिक मार्क करत असल्याचे संपूर्ण सभागृहाने पाहिले.त्यामुळे काही काळ व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांची पंचायत झाल्याचे पाहायला मिळाले.शेवटी जयंत गुरुजींनी शाळा बंद केल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.