जयंत पाटलांनी वाजपेयींच्या नावाने खपविली दुसऱ्याच कविची कविता!

0
निलेश झालटे,मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे अभ्यासपूर्ण वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणात मिश्किली करताना ते अनेकदा शेरोशायरी आणि कवितांचा वापर करतात. त्यांच्या या शैलीमुळे अनेकदा त्यांना वाहवाही देखील मिळते. मात्र आज विधानसभेत त्यांनी चक्क एका दुसऱ्याच कवीची कविता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने खपवून टाकली.
विरोधी पक्षाच्या २९३ प्रस्तावावर बोलत असताना जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजना आणि धोरणावर टीकांची बरसात केली. मात्र या भाषणाची समाप्ती करताना त्यांनी  सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे ही कविता अटलबिहारी वाजपेयी यांची असल्याचे सांगितले. मात्र ही कविता हिंदीतील प्रसिद्ध कवी पुष्पमित्र उपाध्याय यांची आहे.

अशी आहे कविता 
“छोडो मेहँदी खडक संभालो,
खुद ही अपना चीर बचा लो

द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे,
 सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे|
कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से|
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे|
कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है|
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?

सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

ही कविता प्रस्तुत केल्यावर ही कविता अटलबिहारी वाजपेयी यांचीच असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोमणाही मारला. मात्र ही कविता उपाध्याय यांची असल्याने जयंत पाटील हे सभागृहात चक्क खोटे बोलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.