जयदत्त क्षीरसागर शिवबंधनात अडकले !

0

बीड: राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बीड जिल्ह्यातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. अखेर आज बुधवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज मातोश्रीवर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीत त्यांनी माझी कुचंबना झाली, सगळ्या गोष्टी असह्य झाल्यावर मी शिवसेनेत प्रवेश केला. माझ्या मनात शिवसेनेबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण राहिले आहे. शिवसेनेत जाती-पातीचे राजकारण होत नसल्याने मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. जयदत्त क्षीरसागर आणि एक्झिट पोलचा काहीही संबंध नाही, कारण यापूर्वी त्यांचा प्रवेश ठरला होता असे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना वाढत आहे, पक्ष विस्तारत आहे. बीड जिल्ह्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवीत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सांगितले.