जळगाव । येथील मुंदडा नगरातील रहिवासी जयदीप विश्वास भट यांना नुकतीच जर्मनीतील किल शहरातील ख्रिश्चन ऍलबर्च विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. 2009मध्ये जळगावातून विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर जयदीप यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यानंतर सप्टेंबर 2011मध्ये ते उच्च शिक्षण व संशोधनासाठी जर्मनीला रवाना झाले. त्याठिकाणी नॅचरल सायन्सेस विभागांतर्गत इपिजेनेटिक ऍनालिसीस ऑफ ह्युमन’ या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण करुन डॉक्टरेट मिळवली.