जयदेव, यश यांची उपांत्यफेरीत धडक

0

मुंबई । जयदेव मेनन आणि यश तिवारी यांनी आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात विजय मिळवत सीसीआय ग्रेटर मुंबई डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यफेरीत धडक मारली. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि द ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीबीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सीसीआय बॅडमिंटन कोर्ट्सवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बिनमानांकित जयदेवने तिसर्‍या मानांकित मिशील शाहला नमवत धक्कादायक निकाल नोंदवला. त्याला पहिल्या गेममध्ये चुरशीचा सामना करावा लागला.पण, त्याने आपला खेळ उंचावत चमकदार कामगिरी करत 21-17, 21-9 असा विजय मिळवत आगेकूच केली. दरम्यान, चौथ्या मानांकित यशने बिनमानांकित दीपक जेटलीला 21-10, 22-20 उपांत्यफेरीतील आपली जागा निश्‍चित केली.

मुलांच्या 19 वर्षांखालील गटातील सामन्यात अव्वल मानांकित जयदेवने विक्रांत निनावेला 21-10, 21-7 असे पराभूत केले. दुसर्‍या मानांकित सिद्धेश राऊतने राहिल पारीखला 21-11, 21-13 अशा फरकाने पराभूत केले.

निकाल – मुली 13 वर्षांखालील ( उपांत्यफेरी) : 1- तारीनी सूरी वि. वि. तारुशी यादव 21-5, 21-3, 2- नयशा बातोये वि. वि. रिया विन्हेरकर 21-7, 21-6. मुली 15 वर्षाखालील (उपांत्यफेरी): तारीनी सूरी वि. वि. शची जुकर 21-12, 21-9, नयशा बातोये वि. वि. सानवी मारडोळकर 21-11, 21-7. मुले 13 वर्षांखालील ( उपांत्यफेरी): 1- शास्वत कुमार वि. वि.एसा मोटरवाला 21-9, 21-7, 2- वज्र मैनकर वि. वि. रोहन सिंग 21-7, 21-6. महिला एकेरी (उपांत्यपूर्व फेरी) : सामीआ शाह वि. वि.निधी पटेल 21-7, 21-8, पूजा कचरे वि. वि. स्नेहा म्हादळेकर 21-8, 21-11, 2- करीना मदन वि.वि. शलाका कांबळी 21-2, 21-4. पुरुष एकेरी (उपांत्यपूर्व फेरी) : 1- नायजेल डीसा वि. वि. सिद्धेश राऊत 21-5, 21-9, जयदेव मेनन वि. वि.3- मिशील शाह 21-17, 21-9, 4- यश तिवारी वि. वि.दीपक जेटली 21-10, 22-20, 2-विपलाव कुवळे वि. वि. सिद्धेश आरोसकर 21-15, 21-13.