शहादा- तालुक्यातील जयनगर गावातील उकीरड्यावर 9 महिना 9 दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती कळताच सारंगखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी घटनास्थळी भेट देत अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील विठ्ठल माळी (रा.जयनगर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात महिले विरूद्ध भांदवि 118 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अनैतिक संबंधातून हे बालक जन्माला आल्याचा संशय व्यक्त होत आहे.