शहादा। तालुक्यातील जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात डिजिटल वर्ग साकारण्यासाठी पुणे येथील सिंधु ह्युमिनीटी फाउंडेशन या सस्थेने सहकार्य केले. या डिजिटल वर्गाचा शुभारंभ सिंधुताई पाटील यांचा हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास सिंधु ह्युमिनीटी फाऊंडेशनचे संचालक डॉ. टी. टी. पाटील, सस्थेचे संचालक बंसी पाटील उपस्थिती होते. प्राचार्य आर. डी. माळी यांच्या हस्ते डॉ. टी .टी. पाटील व सिंधुताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील यांनी विध्यार्थ्याना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. यावेळी इय्यत्ता 5वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रम प्रोजेक्टसह देण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव विठोबा माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पी. आर. पाटील यांनी तर सुत्रसंचालन ए. एच. पाटील यांनी केले.