जयललितांच्या आयुष्यावर बायोपिक

0

मुंबई – अम्मा नावाने ओळखल्या जाणाऱया तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री, अभिनेत्री आणि नृत्यांगणा अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱया नेत्या जायललीतांच्या आयुष्यवर आधारित चित्रपटही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे.

तमिळ चित्रपट निर्माते विजय हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

या चित्रपटात जयललिता यांची भूमिका कोण निभावणार याबद्दल कोणतीही घोषणा अजून केली नाही. मात्र, यात बॉलिवूड किंवा दाक्षिणात्य कलाकार झळकणार असल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.