चेन्नई । तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललीता यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राधाकृष्णन नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगमचे (एआयएडीएमके) उप महासचिव टी.टी.बी. दिनकरन पक्षाचे उमेदवार असणार आहेत. एआयएडीएमकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार 12 एप्रिल रोजी होणार्या पोटनिवडणुकीत दिनकरन पक्षाचे उमेदवार असतील. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले असून, या मतदार संघातील निवडणुकीसाठी 16 ते 23 मार्च दरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदत असेल. 12 एप्रिल रोजी होणार्या निवडणुकीचा निकाल 15 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आहे.
निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे चेन्नईत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जयललिता यांनी पाच वर्षांपूर्वी टी.टी.वी. दिनकरन आणि एस.व्यंकटेश यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पण, जयललिता यांच्या मृत्यूनंतर भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवल्यावर शशिकला यांनी लगेचच दुसर्या दिवशी दिनकरन यांची पक्षाच्या उप महासचिवपदी नेमणूक केली होती. शशिकला आणि त्यांचे दोन नातेवाईक एलवारसी आणि कारागृहात शिक्षा भोगत आहेत. माहिती कायद्यानुसार 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी शशिकला यांना त्यांचा भाचा आणि एआयडीएमकेचे उप महासचिव टी.टी.वी. दिनकरन यांच्याशी 35 ते 40 मिनिटे भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती.
तामीळनाडू विधानसभेत शशिकला यांचे विश्वासू इ. पलानीस्वामी यांनी बहुमत सिद्ध केल्यावर दिनकरन यांनी 20 फेब्रुवारी रोजी शशिकला यांची भेट घेतली होती. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या शशिकला आणि त्यांचे दोन नातेवाईक चार वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी दुसर्यांदा कारागृहात गेले आहेत. तामीळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता यांच्यासह शशिकला, एलवारसी आणि सुधाकरन यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवल्यावर हे चौघे 2014 मध्ये 27 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत बेंगळुरू कारागृहात होते.