जयश्री लोढा यांना आदर्श सून पुरस्कार

0

आळंदीः श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांच्या स्नुषा व संस्थेचे सदस्य अनिल वडगांवकर यांच्या पत्नी स्व.वंदना वडगांवकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून जयश्री लोढा आणि अनिता लोढा यांना ‘आदर्श सून’ पारितोषिकाने गौरवण्यात आले. यानिमित्त प्रशालेत प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.शांतीब्रम्ह मारुती महाराज कुर्‍हेकर, नगरसेविका योगिता नागरगोजे, उद्योजिका डिंपल जैन, श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ह.भ.प.नारायण महाराज जाधव यांनी शंकराचार्य यांच्या ग्रंथातील भारतीय तत्वज्ञानाच्या विचाराचे आचरण करून प्रत्येक माणसाने अध्यात्मिक दृष्टया आपली उन्नती करून घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. आभार ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी मानले.