धुळे । शहरातील जयहिंद महाविद्यालयाजवळ असलेले बियर बार बंद करण्याची मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी जोरदार निदर्शने आणि उत्स्फुर्तपणे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बियर बार आणि जयहिंद महाविद्यालय यामधील अंतर कमी असल्याचे तक्रार यावेळी करण्यात आली. बिअर बार व जयहिंद महाविद्यालय यातील अंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडून मोजून घेण्यात आले. हे अंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मोजले असता 93 मीटर इतके अंतर असल्याने निदेर्शनास आले.
घोषणांनी परिसर दणाणला
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक डी. के. क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले कि, शासनाच्या नियमानुसार 75 मीटर आत बियर बार नसावी असा नियम असल्याचे सांगितले. त्यावेळी भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्याचवेळी बियर बारच्या बाहेरच रास्ता रोको करून जोरदार घोषणा देत निदेर्शने केली. या वेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते. प्रतिभा चौधरी यांच्या सोबत परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांसह तरूण-तरूणींचा आंदोलनात सहभाग
प्रतिभा चौधरी यांनी सांगितले की अशा प्रकारचे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक प्रभागात राबवण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिक तरुण, तरुणी, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नागरिकांनी आधार कार्डाची झेरॉक्स देत हरकती नोंदविल्या. यावेळी मिलिंद मुदवडकर, डॉ.योगेश ठाकरे, डॉ. चेतन पाटील, केदार जोशी, प्रा.सागर चौधरी, वैभव बडगुजर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात इतर ठिकाणीही आंदोलनाचा इशारा
महाविद्यलयाजवळचे बियर बार असल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या. परंतु, बियर बार व जयहिंद महाविद्यालय यात नियमानुसार अंतर असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक डी. के. क्षीरसागर यांनी दिली. अधिकार्यांच्या या उत्तराने आंदोलकांनी बियर बारच्या बाहेर रस्ता रोको करून शहरातील इतर भागात देखील असे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी दिला.