सचिवपदी सुनंदा औंधकर : मंगळवारी होणार पदग्रहण समारंभ
भुसावळ- शहरातील जय गणेश फाउंडेशन संचलित श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष दिनकर जावळे तर सचिवपदी सुनंदा औंधकर यांची निवड करण्यात आली. रवर्षाप्रमाणे यंदाही पदग्रहण सोहळा कोजागरी पौर्णिमेला होणार असून कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. संघाच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष विलास चौधरी, निशा क्षिरसागर, सहसचिव पी.एन.चौधरी, कोषाध्यक्ष सुरेश पाटील, ऑडिटर शांताराम बोबडे, पदसिद्ध सदस्य एम. यु. पाटील, वसंत चौधरी, कार्यकारिणी सदस्य एस. के. पाटील, डी. व्ही. इंगळे, भास्कर पाटील, भानुदास बर्हाटे, मालती लोंढे, अलका अडकर, सुलोचना वारके, मंगला वाणी, समन्वयक अरुण मांडळकर यांचा समावेश आहे.
मंगळवारी पदग्रहण सोहळा
नूतन कार्यकारीणीचे पदग्रहण व पुरस्कार वितरण सोहळा कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अर्थात मंगळवार, 23 रोजी सकाळी 9.30 वाजता सुरभीनगरातील नवसाचा गणपती मंदिरात होईल. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या ‘अनुभूती’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.वा.ना. आंधळे, भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे मावळते अध्यक्ष एम. यु. पाटील, सचिव वसंत चौधरी, कोषाध्यक्ष शांताराम बोबड यांनी केले आहे.
ज्येष्ठांचा उत्साह चिरतरुण
जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघातर्फे गेल्या सहा वर्षांपासून दर शनिवारी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात ज्येष्ठांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवणारा आहे. यंदाही संघातर्फे विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यात सभासदांच्या पाल्यांचा गौरव, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, गोरगरींबाना फराळ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अशा प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे, असे समन्वयक अरुण मांडळकर म्हणाले.