जय गणेश फाऊंडेशनच्या रंगभरण स्पर्धेला चिमुकल्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

0

भुसावळ- शहरातील सुरभी नगरातील जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 20 रोजी सकाळी आयोजित रंगभरण स्पर्धेला चिमुकल्यांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद देत आकर्षक रंगचित्रे रेखाटली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आर्ट व्हिजन भुसावळचे राजेंद्र जावळे, कलाशिक्षक संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, गणेश फेगडे, समन्वयक अरुण मांडळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी रवी जोनवाल, हर्षल वानखेडे, राजेंद्र कोलते आदींनी सहकार्य केले. दरम्यान, दुपारी चार वाजता रांगोळी स्पर्धा तर रात्री आठ वाजता लहान गटासाठी ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे.

उद्या मोठ्या गटासाठी ग्रुप डान्स
शुक्रवार, 21 रोजी रात्री आठ वाजता मोठ्या गटासाठी ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. शनिवार, 22 रोजी रात्री आठ वाजता अंधश्रद्धा आणि जादूचे प्रयोग जादूगार एस.के.जादूगर सादर करणार आहेत. रविवार, 23 रोजी सकाळी दहा वाजता मराठमोठ्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या श्रींच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.