‘जय जय पांडुरंग हरी’: मोदींच्या मराठीतून शुभेच्छा

0

नवी दिल्ली:- आषाढी एकदशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा देत मराठीतून “जय जय पांडुरंग हरी” म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो.आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना . जय जय पांडुरंग हरी.</p>&mdash; Narendra Modi (@narendramodi) <a href=”https://twitter.com/narendramodi/status/1278232598024646656?ref_src=twsrc%5Etfw”>July 1, 2020</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा, असे म्हटले आहे.

तसेच विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना असे ट्विट केले आहे.