भुसावळ । तहसिल कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन वंदना करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसिलदार भगवान शिरसाठ, दुर्गेश राजपूत, सुदाम नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त ढोल-ताशाच्या गजरानेे दुमदुमलेे शहर
शहरात मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमच शहरात स्वाभीमानी रॅली काढण्यात आली.सकाळी 11 वाजता रॅलीची सुरूवात शिवाजीनगर येथून झाली. आंबेडकर पुतळा, बस स्टॅण्ड, अमर स्टोअर्स, गांधी चौक, मरिमाता मंदिर, नृसिंह मंदिर, वाल्मिक चौक, या मार्गे दुपारी रॅलीचा युनियन बँकेसमोर समारोप झाला. रॅलीत चित्ररथ ढोलपथक, झांज पथक, लहान मुलांचा आखाडा, बेटी बचाव प्रबोधन, लेझीम पथक, सजीव देखावा, ढोल ताशा पथक होते. अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील, नरेश पाटील, बापू पाटील, संजय कदम, महेंद्र ठाकरे, गौरव आवटे, सभापती राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रा. लेकुरवाडे आदी उपस्थित होते. स्वाभीमानी या रॅलीत मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ यांच्या वेशभुषेत चिमुकल्यांनी शहराचे लक्ष वेधले होते. ढोल ताशा, लेझिम पथक,यासह विविध वाद्य मिरवणूकीत होते. यावेळी बाजारपेठ पोलिस निरीक्षक चंद्रकात सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बोदवडमध्ये जिजाऊ उद्यानापासून मिरूणुकीला प्रारंभ
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची 387 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रथम शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे जिजाऊ उद्यानात प्रतिमांचे पूजन करुन मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील मलकापूर चौफुलीजवळ महाराणा प्रतापसिंग, बोदवड-भुसावळ चौफुलीजवळ, महात्मा ज्योेतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व शिवद्वारजवळील प्रतिमांना शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी पुष्प अर्पण केले. गांधी चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनगर, नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख, अॅड. रविंद्र भैय्या पाटील, गटनेते कैलास चौधरी आदींनी शिवरायाच्या प्रतिमेचे पूजन केले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिपक झांबड, उपाध्यक्ष असलम बागवान, कार्याध्यक्ष अमोल अमोदकर, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता के.पी. धांडे आदी उपस्थित होते.
वरणगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी
येथील विविध मंडळांकडून अनेक ठिकाणी शिवरायांच्या मुर्तीचे पुजन व मोटरसायकल रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. तरुण मित्र मंडळ शिवाजी नगर (मोठी होळी) यांच्या वतीने 18 रोजी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला येथील महात्मा गांधी विद्यालयाचे कलाशिक्षक ए.एन. वानखेडे, शिक्षिका आर.एस. साळुंके व टी.एम. तडवी यांनी सहकार्य केले. यात इयत्ता चौथी, पाचवी, सहावी सातवी या गटातुन अनुक्रमे शिवानी पाटील, प्रतिक पवार, मनिष झांबरे, पुनम राजहंस यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 19 रोजी सकाळी शिवाजी चौक, गांधी चौक नगरपालीका शिवाजी महाराज उद्यान, भाजी सात आदी ठिकाणी शिवरायांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. तसेच छत्रपती गृपतर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शिवाजी नगर मित्र मंडळातर्फे कॉलनी परिसरात रॅली काढण्यात आली.सुसरी, टहाकळी, अंजनसोडे, तळवेल या गावात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. सायकांळी तरुण मित्र मंडळातर्फे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये व घोड्यांवर शिवरायांच्या जीवनावरील सजीव देखावे तयार करून मिरवणूक काढण्यात आली.
खिर्डी येथेही उत्साहात अभिवादन
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत उत्साहाने छत्रपती शिवाजी महराज जयंती साजरी करण्यात आली. प्रथम महराज यांची प्रतिमेला शाळेतील मुख्याध्यापक अहेमद खान समद खान यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक आदिल खान, अनीस खान, जावीद खान, एजाज अहेमद, रिजवान खान, शेख इद्रीस आदी उपस्थित होते.
शाहीर पाटील यांचे पोवाडा गायन
मराठा समाजातर्फे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त 18 रोजी टिंबर मार्केट येथे नगरदेवळांचे शिवाजीराव पाटील यांचा पोवाडा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी तरुण पिढीसाठ सुचना केली की, कुठल्याही शोभायात्रेत दारु पिवून नाचू नका, छत्रपतींची शिकवण लक्षात घेवून धर्म व सामाजिक बांधिलकी जण असंख्य श्रोत्यांनी याचा लाभ घेतला. शोभायात्रेत असोदा येथील ढोलपथक, कंडारी येथील लेझिम पथक, बर्हाणपूर येथील ढोलताशा पथक, भुसावळचे मुलींनी राजमाता जिजाऊंचे सजीव देखावे निर्माण केले होते. या देखाव्याला पाहून येणार्या जाणार्यांचे लक्ष वेधत होते. तसेच शहरात मोठ्या संख्येने मिरवणुकीची वेगवेगळ्या पध्दतीत आराससुध्दा तयार केल्या होत्या. मिरवणूक शांततेत पार पडली. शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता. मात्र कोणत्याच प्रकारचे मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला नाही व देखाव्यांमध्ये आलेल्या उत्कृष्ठ देखाव्यांना मराठा समाजतर्फे पारितोषिक वितरण करण्यात आले. समाजाच्या अध्यक्ष तसेच स्वयंसेवकांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडले.
डॉ.आंबेडकर वाचनालयात प्रा. निकम व्याख्याते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेचे हारपुष्प टाकून प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर महाराजांच्या जीवनावर वाचनालयात मार्गदर्शन करण्यात आले व प्रा. उत्तम निकम यांनी प्रतिमेस माल्यार्पण करुन महाराजांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. यावेळी धम्मरत्न चोपडे, सोनाली निकम, चोपडे, अभिलाष शेगावकर, विलास शेगावकर, विजय तायडे, विनोद तायडे, गोपाळ भंगाळे, मनोहर वारके, आर.आर. खुरपुडे, मोहन नारखेडे, वामन नेमाडे, प्रमोद नेमाडे, राज देवगडे, वासुदेव सोनार, आंभोरकर, बाबुराव झांबरे, मधुकर चौधरी, संदिप चौधरी, प्रमोद भादलीकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.