जळगाव । पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 293वी जयंती शहरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटनांतर्फे अल्पबचत भवनात जयंतीचा कार्यक्रम व सामाजिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली चित्रा चौक, जुने बस स्टँड, टावॅर चौक, नेहरू पुतळा, गोविंदा रिक्षा स्टॉप, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौक मार्गांने कलेक्टर ऑफीसला रॅलीचा समारोप करण्यात आला.
पूजन, माल्यार्पण करून उद्घाटन
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका गोडे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर पुष्पा गुलवाडे, प्रदेशाध्यक्ष राज्य महिला संघाचे अलका गोडे, केशव पातोंड, प्रमुख वक्ते प्राचार्य सुनिल पाटील भडगाव, सुभाष सोनवणे, संतोष धनगर, सुरेश धनके, अमित देशमुख, गणेश बागुल, रेखा न्हाळदे, मंजुषा सुर्यवंशी, संगीता चिंचोरे, नोगेश हडपे, सुभाष करे, गणेश जाणे, डॉ. संजय पाटील, विष्णू आप्पा ठाकरे, रघुनाथ सोनवणे, दिलीप धनगर, संदीप तेले, हिलाल सोनवणे, संदीक मनोरे, डिगंबर सोनवणे, शेषराव वलकर, भरत यवस्कर, प्रभाकर न्हाळदे, हरिभाऊ हिवराळे, महेंद्र सोनवणे, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.
जीवन कार्यांचा परिचय
प्रास्ताविक गणेश बागुल यांनी केले. प्रमुख वक्ते सुनील पाटील यांनी अहिल्या देवींचा परिचय समाजासमोर मांडला. सुभाष सोनवणे यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला एकत्रित करुन त्यांना संघटीत करण्याचे काम धनगर समाज महासंघ व मल्हार सेनाने केल्याचे सांगितले.
रॅलीत सहभागी महिलांचे अभिनंदन
प्रमुख पाहुण्या पुष्पा गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका गोडे यांनी उपस्थित महिला रॅलीत सहभागी झाल्याने अभिनंदन केले. सूत्रसंचालन वंसुधरा लांडगे यांनी तर आभार प्रविण धनगर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. संजय पाटील, प्रवीण पवार, महेंद्र सोनवणे, आकाश कंखरे, निलेश धनगर यांनी कामकाज पाहिले.हिलाल सोनवणे यांची धनगर समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.