जय महाराष्ट्रला नमवित योध्दा संघ ठरला सरपंच चषकाचा मानकरी

0

साकेगाव । साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित सरपंच चषक 3 मध्ये शेवटच्या चेंडूवर गतविजेता जय महाराष्ट्रला नमवत योध्दा संघाने पटकाविला. योध्दा संघ गेल्या दोन वर्षांपासून अंतीम सामन्यात पराभव पत्करावा लागत होता. पराभवाची मालिका या संघाने खंडीत केली. तत्पूर्वी उपउपांत्य फेरीत योध्दाने नवनाथ संघाला पाच धावांनी नमवत अंतीम सामन्यात प्रवेश मिळविला तर दुसर्‍या उपांत्य फेरीत जय महाराष्ट्र व जय बजरंग सामन्यात जय महाराष्ट्रने बाजी मारुन अंतीम सामन्यात प्रवेश मिळविला.

जय बजरंगने आठ गड्यांनी जिंकला सामना
यामध्ये जय हनुमान व त्रिमुर्ती संघात झालेल्या सामन्यात त्रिमुर्तीने चार गड्यांनी विजय मिळविला. एसएससी विरुध्द वीर भगतसिंगमध्ये झालेल्या सामन्यात एसएससी संघाने सात गड्यांनी सामना जिंकला. एस.पी. मल्हार व बजरंग गृपमध्ये झालेल्या सामन्यात जय बजरंगने आठ गड्यांनी सामना जिंकला.

मातृभूमि व महाराष्ट्र संघात झाली चुरस
साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित सरपंच चषक 3 मध्ये झालेल्या सामन्यात जय महाराष्ट्र त्रिमुर्ती, जय बजरंग, व ओम साईराम गृपने आपआपले सामने जिंकून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गावातील स्थानिक 18 संघांनी सहभाग घेतला आहे. 2015 व 2016 मधील विजेता ठरलेला मातृभूमि व जय महाराष्ट्र संघात चुरशीच्या सामन्यात जय महाराष्ट्र संघाने 15 धावांनी विजय मिळविला. यात डॉ. दिपकराज पाटील यांनी सामनावीरचा बहुमान मिळविला.

10 धावांनी मिळाला विजय
अंतीम सामन्यात जय महाराष्ट्रने प्रथम फलंदाजी करतांना 10 षटकात 50 धावा केल्या. जय महाराष्ट्रतर्फे दिपक पाटील यांनी 27 धावा काढल्या तर योध्दातर्फे पोलीस कर्मचार्‍याने षटकारसह निर्णायक ओव्हरमध्ये 10 धावा काढून योध्दा संघाला विजय मिळवून दिला.