जय वाघाच्या बछड्याची शिकार

0

चंद्रपूर । चंद्रपुरात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या बछड्याची शिकार झाल्याचे समोर आले आहे. श्रीनिवासन या बछड्याचा मृतदेह आढळल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे.

श्रीनिवासनची शिकार करणार्‍या शिकार्‍यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. विद्युतस्पर्शाने श्रीनिवासनचा जीव घेतल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. श्रीनिवासन या बछड्याच्या अवयवांची तस्करी करुन उर्वरित भाग पुरल्याचे त्यांनी सांगितले. नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीनिवासनचा मृतदेह आढळला. महादेव इरपाते या शेतकर्‍याच्या शेतात बछड्याचा मृतदेह सापडला. याच ठिकाणापासून अर्ध्या किमी अंतरावर दोन दिवसांपूर्वी श्रीनिवासनचा कॉलर बेड सापडला होता.